‘मिरची’ ने केला अज्ञातावर जीवघेणा हल्ला! पोलिसांत गुन्हा दाखल

हिंगणघाट : अनोळखी व्यक्‍तीच्या पॅन्टचे खिसे तपासून त्याच्या डोक्यावर तीन वेळा दगडाने प्रहार करीत जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना कलोडे चौक परिसरात असलेल्या सुजल हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी आरोपी राजू ऊर्फ मिरची गुणवंत दुरबुडे याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कलोडे चौकात असलेल्या सुजल हॉटेलच्या बाहेर एक अनोळखी व्यक्‍ती बसून होता. दरम्यान, तेथे राजू ऊर्फ मिरची दुरबुडे हा आला. त्याने अज्ञात व्यक्तीच्या पॅन्टचे खिसे तपासले. तो इतक्यावरच थांबला नसून त्याने वजनदार दगडाने तीन वेळा अज्ञाताच्या डोक्यावर प्रहार केला. जखमी व्यक्‍ती बेशुद्ध असल्याने त्याची ओळख पटली नसून त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपीस पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. हििणघाट शहरात मागील काही महिन्यांत गुन्हेगारी पुन्हा फोफावल्याचे दिसून येत आहे. अगदी क्षुल्लक क्षुल्लक वादातून जीवघेणा हल्ला, तसेच खुनाच्या घटना घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत अशा गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here