नादुरुस्त बसला कारची धडक! चार गंभीर; वर्धा-देवळी मार्गावरील घटना

वर्धा : ब्युरो. नादुरुस्त झालेल्या बसची दुरुस्ती करत असताना भरधाव वेगात येत असलेल्या कार क्र. एमएच 49 एफ 1060 ने जोराची धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.45 वाजताच्या दरम्यान, वर्धा- देवळी मार्गावर घडली.

फिर्यादी मिनीषा रामदास वाळके (31) रा. पुलगाव यांची बस नादुरुस्त झाली. सदर बसचे पॉपुलर शॉपचे मेकॅनिकल प्रमोद चांदारे व ज्ञानेश्‍वर वाघमारे तसेच चालक काम करीत होते. दरम्यान, देवळीकडून वर्धेकडे जाणाऱ्या कार क्र. एमएच 49 एफ 1060 च्या चालकाने आपल्या ताब्यातीकल वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून उभ्या नादुरुस्त बसला मागून धडक दिली. या अपघातात दोन मेकॅनिकल, बसचा चालक व स्वतः कारचालक असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिनीषा वाळके यांच्या फिर्यादीवरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here