धुरा फोडल्याने युवकास मारहाण! पोलिसात तक्रार दाखल

देवळी : माझ्या शेतातील धुरा का फोडला, या कारणातून वाद करीत युवकास दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. चिखली परिसरात ही घटना घडली. राजेंद्र मुंदावने हा रस्त्याने जात असताना प्रवीण वाघ आणि दादाराव वाघ याने रस्त्यात अडवून शेताचा धुरा का फोडला या कारणातून वाद करीत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. इतकेच नव्हेतर राजेंद्रच्या आईलाही धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here