दुचाकी अपघातात बहीण-भाऊ जखमी

रोहणा : दुचाकीला माकड आडवे आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात बहीण-भाऊ जखमी झाले. हा अपघात मारडा फाट्याजवळ झाला. रोहणा येथील शुभम बुरघाटे व त्याची बहीण अपेक्षा हे दोघेही दुचाकीने पूलगावला जात होते. मारडा फाट्याजवळ अचानक माकड आडवे आल्याने दुचाकीचा अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले. अपघात झाल्याचे माजी जि.प. सदस्य गजानन निकम व चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी जखमींना पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here