भंगार वेचणाऱ्यास चाकूने भोसकले! गंभीर जखमी; सामान्य रुग्णालयात दाखल

वर्धा : भंगार गोळा करून त्याची विक्री करणाऱ्या युवकास अज्ञाताने चाकूने भोसकून जबर जखमी केले. ठाकरे मार्केट परिसरातील मैदानात ही घटना घडली. विक्की मदत कुयकर, रा. इंदिरानगर हा भंगार वेचण्याचे काम करतो.

दिवसभर भंगार गोळा करून जमा झालेले भंगार इतवारा येथे भंगार दुकानातून विकतो. तो भंगाराचे साहित्य विक्री करुन रात्रीच्या सुमारास घरी जात असताना ठाकरे मार्केट परिसरात असलेल्या मैदानात बसला असता तेथे इतवारा येथील भंगार गोळा करणारा एक लांब केस असलेला युवक आला. दरम्यान, विक्कीने त्याला तू माझे भंगाराचे साहित्य का चोरले असे म्हटले असता अज्ञाताने चाकू काढून विक्कीच्या पोटात भोसकले. यात विक्की गंभीर जखमी झाला. त्याला दोघांनी उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here