
वर्धा : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तू माझ्यासोबत फिरायला चल, असे युवकाने म्हटले. त्यास पीडित युवतीने नकार देताच आरोपीने मुलीच्या गाळावर दोन-तीन थोपडा मारून मारहाण केली. ही घटना पुलगाव येथील नाचणगाव नाक्याजवळ घडली. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही कॉलेजमध्ये फि भरण्याकरिता गेली होती.
दरम्यान, भीमनगर पावर हाऊस रोडने नाचणगाव नाक्याजवळ जात असताना आरोपी अशिषेक लोणारे रा. पुलगाव याने पाठलाग केला. त्यानंतर आरोपीने तू माझ्यासोबत फिरायला चल, यावरून पीडित मुलीने त्यास नकार दिल्यामुळे तिला मारहाण केली. त्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करून पीडित युवतीला वारंवार त्रास देत होता. तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.