
वर्धा : भूगाव येथील इवोनीथ कंपनीतील टेलिफोन ऑफिसमध्ये सफाई कामगाराने १४ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास सिलिंग फॅनला दोराने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने कंपनी प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. सावंगी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मारोतराव बाळकृष्ण भोयर (४७ रा. सेलू काटे) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. मारोतराव हे मागील १० वर्षापासून इवोनीथ कंपनीतील रेस्ट हाऊसमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते. १३ रोजी त्यांची दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत कामाची वेळ होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास टेलिफोन ऑफिसच्या कार्यालयात असलेल्या सिलिंग फॅनला दोर बांधून आत्महत्या केली. या घटनेने कंपनीत एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.





















































