
देवळी : स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई करून शोळ्या चोरी करणाऱ्या टोळीला त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बळ १५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे हे चोरटे महागड्या कारचा वापर करून शेळ्या चोरत होते.
तालुक्यातील इसापूर, काजळसरा व वायगाव आदी गावातून शेळ्या चोरून नेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर, हालचालींना गती दिली. दरम्यान, पोलिसांनी ठोस माहितीच्या आधारे यवतमाळ येथील चार व्यक्तींना तांब्यात घेत विचारपूस केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी 30 हजार ६०० रुपये नगदी तसेच टाटा व सफारी या दोन चारचाकी वाहन असा एकूण १५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रावण फुलमाळी, पवन ननवरे, रोशन क्षीरसागर व मनोज राजपूत सर्व रा. पाटीपुरा, यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी पोलिसांनी सांगितले. देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलिसांनी ही कामगिरी केली. मागील. काही… दिवसांपासून तालुक्यातील. ग्रामीन भागात चोरट्यांची दहशत पसरली होती. पण पोलिसांनी अखेर शेळी चोरांची टोळी जेरबंद केली आहे.