जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास

वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मिलिंद पांडुरंग राऊत (53, रा. साबळे ले-आउट, वर्धा, असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.

गच्चावर उभी राहून मोबाइलमधील गाणे ऐकत असलेल्या तरुणीला एकटी असल्याचे हेरून आरोपी मिलिंद याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज तेलगोटे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात शासकीय बाजू अँड. गिरीश तकवाले यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून साहाय्यक फौजदार शंकर कापसे यांनी काम पाहिले. या प्रकरणी चार साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश-२ आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मिलिंद पांडुरंग राऊत याला भादंविच्या कलम ३५४ (अ) (१) i) अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास, कलम 3४५ (ड) (१) ii) नुसार दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच कलम ३५७ (१) अन्वये पीडितेस नुकसानभरपाई म्हणून तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here