दुसर्‍यांदा बोर जलाशयाचे तिन दरवाजे उघडले जाणार! सततच्या पावसामुळे जलाशय ९० टक्के भरले

संजय धोंगडे

सेलू : तालुक्यातील बोरधरण येथील बोर जलाशयात पाणी साठ्यात वाढ झाल्याने बोर जलाशयाचे तिन दरवाजे आज दुपारी तीन वाजता उघडण्यात येणार आहे.
या आठवड्यात दुसर्‍यांदा येथील बोर जलाशयातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे जलाशय ९० टक्के भरले असून पुढे अशीच पावसाची परिस्थिती राहिल्यास आणखी काही दरवाजे उघडण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आज शनिवार (ता. २९) दुपारी तीन वाजता दरम्यान तीन दरवाज्यातून तिस सेंटिमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here