चोरट्याने घराचे कुलूप फोडले अन् ८ लाख केले लंपास

हिंगणघाट : शहरातील संत चोखोबा वॉर्ड येथील जितेंद्र अमरनाथ राउत वय ३७ यांच्या घरी कुलूप तोडून आठ लाख रुपयांची नगद व सोने स्वरूपात चोरी झाली. संत चोखोबा वॉर्ड येथे राहणारे जितेंद्र राऊत हे गावोगावी फिरून बाजारा बाजारांमध्ये हॉटेलचा फिरता व्यवसाय करतात. यातून त्यांच्याकडे साडे पाच लाख रुपये जमा झाले होते. हे जमा झालेले पैसे ते आपल्या घरातील कपाटात डब्यांमध्ये भरून ठेवत असे. तसेच घरातील सर्व सोने जवळपास आठ तोळे हे देखील कपाटातील डब्ब्यात ठेवलेले होते.

जितेंद्र राऊत यांची दोन्ही मुले हे मोठी वनी येथे त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी म्हणून ठेवलेली आहेत. या दोन्ही मुलांना भेटण्यासाठी म्हणून जितेंद्र राऊत आपल्या पत्नीसोबत शनिवारी १३ मार्च रोजी गेले होते. काल सोमवारी सकाळी ते घरी आल्यावर त्यांना त्यांच्या घराचे दार खुले दिसले घरात जाऊन बघितलं तर कपाटातील सर्व सोने व नगदी पैसे असे एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे त्यांना निदर्शनात आले. लगेच त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच फिंगरप्रिंट देखील घेण्यात आले. हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण हे या प्रकरणात तपास करत आहे.

जितेंद्र राऊत यांचे वडील हे याच घरी खाली राहतात. त्यांच्या मते त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर या दोन दिवसात कोणीही गेल नाहीत किंवा जाताना त्यांना दिसत नाही. मात्र शेजारी असलेली एक महिला यांच्या घरावर वाळवणाचे साहित्य टाकण्यासाठी म्हणून जात होती. या महिलेला विचारले असता शनिवारी व रविवारी दाराला कुलूप लावून होते अशी ही महिला सांगत आहे . यामुळे ही चोरी नेमकी केव्हा झाली व कशी झाली हाच मोठा तपासाचा भाग आहे पोलिसांसमोर ही चोरी एक मोठे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here