डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा वापर! मास्कमुळे त्वचेला सुटतेय प्रचंड खाज

चिकणी (जामणी) : कोरोनाकाळात मास्कचा वापर वाढल्याने त्वचेसंदर्भातील आजार भेडसावत आहेत. यासाठी मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. तोंडावर सातत्याने मास्क राहत असल्याने त्वचेला घाम सुटत असून, यामुळे त्वचारोग उद्भवू शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मास्कचा वापर करावा तसेच सॅनिटायझरचासुद्धा प्रमाणातच वापर करावा.

सॅनिटायझरच्या अतिवापरमुळेही त्वचारोग होण्याची दाट शक्यता असते. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. अल्कोहोलमुळे हाताचा ओलावा शोषून घेतला जात हात कोरडे होतात. यामुळे हाताला भेगाही पडण्याची शकयता असते. तसेच सॅनिटायझर लावल्यानंतर कुठल्याही ज्वलनशील पदार्थाला स्पर्श करू नये, हात भाजण्याची शकयता असते. सॅनिटायझरपेक्षा साबण, पाण्याने हात धुणे सोईचे ठरते.

मास्क आवश्यकच, पण असे करा रक्षण

डिस्पोझेबल मास्कचा पुन्हा वापर करु नये. सतत पास्कला हात लावू नये. यामुळे हातावरील जंतू मास्कला लागू कतात. एकसारखे मास्क लाउन राहू नवे, कापडी मास्क स्वच्छ व जंतूवितरित असेल, याची खात्री करून घ्यावी. एकच पास्क सलग दोन-तीन दिवस वापरू नये. यामुळे जंतूसंसर्गाचा धोका वाढतो व त्वचेसंबधित आजार होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here