विकास काम १३ कोटीची मात्र महिलांकरीता स्वच्छतागृह नाही! बस स्थांनक चौकात महीला स्वच्छतागृह बांधायच पुन्हा पडला विसर

सिंदी रेल्वे : मतदार संघाचे आमदार समीर कुणावर यांच्या प्रयत्नाने शहरात भुतोनो-भविष्य कधी नवे एवढा चक्क १३ करोड रुपयाचा निधी प्राप्त झाला. या नीधीतुन शहरात कमतरता असलेले बर्‍यापैकी विकास काम सुध्दा झाली तरी मात्र नितांत गरज असलेली बसस्थानक चौकात महिलांकरीता स्वच्छतागृहची सोय करुन ही समस्या चक्क पाच वर्षाचा नगर पालीकेचे कार्यकाळ संपुन गेला मात्र निकाली काही काढु शकले नाही.

विशेष म्हणजे पालिकेत सलग पाच वर्षे महीलाजच होते. दोन महीला नगराध्यक्षानी पद भूषविले. शिवाय १७ सदस्य संख्पा असलेल्या पालिकेत ९ महीला सदस्य अधिक नगराध्यक्षा अशी महीलाचीच १० संख्या होती. तरी महीलाचीच ही समस्या कोणालाच का सूचली नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. शंभराहुन अधिक वर्षांपुर्वीची असलेल्या सिंदी नगर पालीकेच्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या १५ हजार ते २० हजारच्या घरात आहे. शहरात दोनच प्रमुख मार्ग रस्ते आहे एक बसस्टॅड ते बाजार तर दुसरा बसस्टॅड ते कांढळी रस्ता चौक दोन्ही रस्ते शहरातील बसस्टॅड चौकात येतात परिणामता शहरात येणारा प्रत्येक जण हा या चौकात आल्याशिवाय राहत नाही सोबतच महीलाची सुध्दा येथे नेहमी वर्दळ असते अशा परिस्थितीत येथे महिलांकरीता स्वच्छतागृहची नितांत गरज आहे.

हे पालीकेचे शहर म्हणून डींगा हाकणार्या, विकासाची मोठमोठी शेखी मिळविणाऱ्या तुम्हा आम्हा सर्व सिंदीकराणसाठी मोठी घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. २१ व्या शतकात वावरताना डीजीटल इंडीया, मॅकींग इंडीया, हिंदु राष्ट, हिंदुस्थान, आधुनिक भारत, सबका साथ सबका विकास, आत्मनिर्भर भारत, स्वच्छ सुंदर भारत, मागेल त्याला घर आणि शौचालय, भारत विश्वगुरु आदी संकल्पना आणि सरकारचे नारे सर्व फोल वाटतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here