जखमी काळविटाच्या पायावर शस्त्रक्रिया! ‘हाड मोडल्याने टाकला रॉड; करुणाश्रमात मुक्त संचार

वर्धा : लगच्या पिपरी (मेघे) येथील पीपल्स फॉर अँनिमल्सद्वारा संचालित करुणाश्रमात असलेल्या एका काळविटाच्या पिलाच्या पायाचे हाड मोडल्याने त्याच्या पायावर तब्बल तीन तासांच्या परिश्रमांती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या काळविटाचे हे पिल्लू मोकळे बागडताना दिसत आहे.

वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी काही दिवसांपूर्वी दोन महिन्याचे काळविटाचे पिल्लू करुणाश्रमात आणले. चालताना लंगडत असल्याने त्याच्या पायाचा एक्सरे काढला असता त्यामध्ये पायाचे हाड मोडल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तब्बत तीनतास चाललेल्या या शस्त्रक्रि येदरम्यान त्याच्या पायात रोड टाकण्यात आला.

काळवीट स्वस्त बसणारा प्राणी नसल्याने त्यावर शस्त्रक्रिया करणे हे मोठे आव्हान होते. पण, करुणाश्रमातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. यापूर्वी वानराच्याही हातात शस्त्रक्रिया करून रोंड टाकण्यात आला. आता काळवीटसह वानराचीही प्रकृती चांगली असून दीड महिन्यानंतर हे रॉड काढले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही प्राण्यांची पीपल्स फॉर अनिमल्सचे आशिष गोस्वामी, आकस्मिक सेवा प्रभारी कौस्तुभ गावंडे, रोहित कंगाले, ऋषिकेश गुजर काळजी घेत आहेत.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here