कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करीत शिवीगाळ! पोलिसात तक्रार दाखल

गिरड : धुऱ्यावरील झाडे तोडू नका, असे म्हटले असता व्यक्‍तीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, पिंपळगाव येथे ही घटना घडली असून २५ रोजी गिरड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. रामकृष्ण नत्थू लोणारे यांची शेती पिंपळगाव येथे असून गजानन आगासे, ताराचंद भगत यांच्यासह काही जण पांदण रस्ता बनविण्यासाठी धुऱ्याजवळ आले.

दरम्यान, ते धुऱ्यावरील झाडे तोडत असताना रामकृष्ण याने झाडे तोहू नका, असे म्हटले असता त्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करीत धमकी देण्यात आली. याप्रकरणी गिरड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या मारहाणीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दर दिवशी अगदी क्षुल्लक कारणातून वाद हे नित्याचेच झाले आहे. परिणामी पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. शेतीच्या वादातून अनेक घटना घडू लागल्या आहे. अशा घटनांवर वेळीच आवर न घातल्यास पुढे मोठी घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनीही समजूतदारिने राहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here