

पवनार : नितीन कवाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या पवनार मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या निवडीप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. सुनील गफाट यांनी त्यांना अधिकृत निवडीचे पत्र देत त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी बोलताना श्री. गफाट म्हणाले, नितीन कवाडे यांची ही निवड राज्यस्तरावरील समितीत सखोल चर्चा करून करण्यात आली आहे. पक्षासाठी सातत्याने निष्ठेने आणि जिद्दीने कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला पक्ष सदैव सकारात्मक प्रतिसाद देतो. नितीन कवाडे यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येते.