खासदार सुप्रिया सुळे यांची ब्रम्हविद्या मंदीराला भेट! जेष्ठ गांधी-विनोबा विचारक गौतम बजाज यांच्याशी चर्चा

पवनार : खासदार सुप्रिया सुळे ह्या वर्धा जिल्हा दौर्यावर आल्या असताना त्यांनी येथील विनोबा भावे यांच्या ब्रम्हविद्या मंदिराला भेट दिली. यावेळी आचार्य विनोबा भावे यांच्या समाधीस्थळाचे त्यांनी दर्शन घेत अभिवादन केले. येथे असलेल्या भरत राम मंदीरालाही त्यांनी भेट दिली.

आश्रमचे जेष्ठ गांधी-विनोबा विचारक गौतम बजाज यांच्याशी विविध विषयांवर त्यांनी प्रदिर्घ चर्चा केली. त्यांची आस्तेने विचारपुस केली. यावेळी गौतम बजाज यांनी आश्रम परीसराची माहिती देत चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here