कानगावात युवकाने घेतला गळफास

अल्लीपूर : नजीकच्या कानगाव येथे एका ४६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केळी. ही घटना सोमवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. प्रवीण दिनकर कोल्हारकर असे मृताचे नाव असल्याचे सांगण्यात आले.

प्रवीण याने धनराज कुंभारे यांची जिनिंग भाड्याने घेतली आहे. तो तेथे राहून कापूस खरेदीचा व्यवसाय करायचा. रात्री याच जिनिंगच्या परिसरातील खोलीत प्रवीण याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच अल्लीपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला शिवाय, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असली तरी प्रवीणच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here