वाद गेला विकोपाला! सत्तूराने एकास केले जखमी

देवळी : अंदोरी येथील आठवडी बाजारात मांस विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवरून दोन मांस विक्रेत्यांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत सत्तूरचा वापर झाल्याने एकाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.

देवळी येथीळ सोनू शहा रशीद शहा याने अंदोरी येथील आठवडी बाजारात मांस विक्रीचे दुकान थाटले असता वाद झाला. विशिष्ट जागेवर दुकान लावण्यास मनाई करूनही सोनू शहा याने दुकान लावल्यामुळे त्याला निसार शहा, गुलफान शहा, अलफाश शहा सर्व रा. अंदोरी यांनी हटकले. सुरूवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर वादाचे हाणामारीत रुपांतरण झाले.

आरोपी निसार शहा, गुलफान शहा, अलफाश शहा याने सोनू शहर रशीद शहा याला सत्तूरने मारहाण करून गंभीर जखपी केले. या प्रकरणी सोनू याच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here