खाजगी डॉक्टर देणार कोविड रुग्णालयात सेवा! रुग्णसेवेसाठी स्वयंस्फूर्तीने नोंदविली नावे

वर्धा : जिल्ह्यात सध्या साडेतीन हजाराहून अधिक अँक्टिव्ह कोविड बाधित रुग्ण आहेत. तर नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढल्याने यात दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. अशातच दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमधील रुग्णखाटा तसेच डॉक्टर अपुरे पडत आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेता खासगी डॉक्टरांनीही कोविड युद्धात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले होते.

याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यात सध्या खासगी डॉक्टरांची वज्रमुठ बांधल्या गेली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत खासगी डॉक्टर आता नियोजित दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात क्टिव्ह कोविड बाधितांवर उपचार करणार आहेत.

तब्बल 20 हून अधिक खासगी डॉक्टर रुग्णालयात दाखल क्टिव्ह कोविड बाधितांसह नवीन कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढे आले आहे. काल 16 एप्रिल पासून डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा अद्ययावत होत नव्या जोमाने कोविडशी लढा देण्यासाठी सज्ज झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here