सोने जमा करण्याच्या योजना आत्तापर्यंत ‘या’ दोन पंतप्रधानांनी राबवल्या; दोघेही भाजपचेच – पृथ्वीराज चव्हाण

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह

कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम पडलेला असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी नुकतेच पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. अशात सरकारने देशातील देवस्थानाकडील सोने जमा करावे अशी अपील राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या. मात्र आता याबाबत चव्हाण यांनी स्वतःचे मत मांडले असून आपल्या विधानाची मोडतोड करून चुकीचा अर्थ पसरवला गेल्याचा आरोप केला आहे.
कोरोना महामारीमुळे देशावर जे आर्थिक संकट आले आहे त्यापार्श्वभूमीवर देशातील विविध व्यक्ती आणि धार्मिक संस्थांकडे जे सोने पडून आहे ते बॅंकाकडे व्याजावर जमा करण्याची अपील मी काल केली होती.मात्र काही समाजविरोधी व्यक्तींनी माझ्या सूचनेची तोडफोड करून त्याचा चुकीचा अर्थ पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असं चव्हाण यांनी म्हटले आहे.
तसेच मी केलेली अपील हि काही नवीन गोष्ट नाही. १९९८ साली पोखरण अनु चाचणीनंतर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनीं १४ सप्टेंबर १९९८ साली गोल्ड डिपॉझिट स्कीम आणली होती. ज्यातून सरकारकडे बरेच सोने जमा झाले होते. त्यानंतर २०१५ साली पंतप्रधान मोदी यांनी यात बदल करून गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम नोव्हेम्बर २०१५ मध्ये सुरु केली असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण सांगितलेली कल्पना हि नवीन नसून आत्तापर्यंत दोन पंतप्रधानांनी सोने जमा करण्याच्या योजना राबवल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच ते दोन्ही पंतप्रधान हे भाजपचेच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम च्या पहिल्याच वर्षात देशातील मोठ्या आठ मंदिरांनी आपल्याकडीन सोने विविध बँकामध्ये ठेवले. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली आहे. यात शिर्डी देवस्थान आणि तिरुपती देवस्थानाचाही समावेश आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका रिपोर्ट नुसार नोव्हेंबर २०१५ पासून ३१ जानेवारी २०२० पर्यंत या योजनेअंतर्गत जवळ जवळ ३००० जणांनी ११ बँकामध्ये साडे वीस टन सोने सरकारला दिले आहे. आपल्या देशात खूप सोने आहे. विश्व सुवर्ण परिषद (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात श्रीमंत वर्ग आणि काही देवस्थानाकडे प्रचंड प्रमाणात सोने आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, आपल्याकडे असणाऱ्या सोन्याचा या संकटाच्या वेळी योग्य उपयोग व्हावा या उद्देशाने मी व्याजावर सोने घेण्याची घोषणा केली होती. मात्र काही भक्त चॅनेलनी आणि राजकीय नेत्यांनी याला मी एखाद्या विशिष्ट धर्माला मध्ये देऊन अशी सूचना केल्याचा आरोप केला आहे. आत्तापर्यंत २ पंतप्रधानांनी सोने जमवण्यासाठी गोल्ड मोबिलायझेशन योजना बनवल्या आहेत. आणि दोघेही पंतप्रधान भाजप पक्षाशी निगडित आहेत असं चव्हाण यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here