
महेन्द्र जुन्नाके
खरांगणा मोरांगणा : शेतातील काम आटपुन घरी परत येत असताना अंगावर विज पडून महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटणा खरांगणा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावंत शिवारात शुक्रवार (ता. ९) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार सावदा येथील शेतशिवारात शेती कामाकरिता गेलेल्या पती-पत्नी पाऊस चालू झाल्यामुळे घरी परत येत असताना वाटेतच विज कडाडली आणि महिलेच्या अंगावर पडली यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. रेणुका सुधाकर करनाके वय 42 वर्ष रा. सावध असे मृत महिलेचे नाव आहे. तर पत्ती सुधाकर गुलाब करनाके वय 48 वर्ष यांना विजेचा धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले.
सदर घटनेची माहिती खरांगणा येथील ठाणेदार संतोष शेगावकर तसेच तहसीलदार विद्यासागर चव्हाण त्यांना दिली येथील ठाणेदार यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून रुग्णवाहिकेची व्यवस्थापक करून दिली. सदर जखमीला व मृत झालेल्या पत्नीला सामान्य रुग्णालय वर्धा येथे हलवीण्यात आले आहे.


















































