

वर्धा : बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी, नांदण नांदण होत रमाच नांदण, भिमाच्या संसारी जस टिपूर चांदण, जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, राजगिर पर्वतपर तथागत विराजमान है यहा दुखियोके निवारण जो आसान है अशा एकापेक्षा एक बहारदार गितांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते, ‘बुद्धपहाट’ या भिम-बुद्धगीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचे.
सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडल व फिल्मी गायिका, भाव्या पंडित, अंजली गायकवाड, मी होणार सुपरस्टार विजेता, राहुल मोरे, विनल देशमुख यांच्या सुरेल आवाजाने रसिकांना अवर्णनीय आनंद अनुभवता आला. या कार्यक्रमाचे आयोजन वर्धा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष नीरज गुजर व मित्रपरिवार यांनी केले होते. तसेच निर्माण सोशल फोरम व बुद्ध पहाट मित्रपरिवार यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पार पडला. बुद्ध पहाट कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिविल लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आयोजक समितीतर्फे हार अर्पण करुण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
बुद्ध पौर्णिमेला ‘तथागत’ गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त्य दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याजवळ निरज गुजर आणि मित्र परिवाराकडून ‘बुद्ध पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. या कार्यक्रमाला हजारोंच्या संखेने उपासक आणि उपासिका पांढरे शभ्र वस्र परिधान करीत या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. यावर्षी या कार्यक्रमाला भल्या पहाटेच पंचवीस हजाराच्या जवळपास नागरीकांनी उपस्थिती लावली होती. अतिशय शिस्तबद्ध रितीने सर्व उपासक आणि उपासिका शांततेत या ठिकाणी बसलेले होते. नजर जाईल तिथपर्यंत लोकच लोक यावेळी दिसत होते. शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातूनही दुरवरुन या कार्यक्रमाला नागरीकांनी उपस्थिती लावली होती.