

पवनार : येथील हजरत सय्यद अहेमद कबीर दर्गा येथे कमेटीच्या वतीने रवीवार ता. ५ ते ८ पर्यंत वार्षीक ऊर्सचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असलेल्या या ऊर्समध्ये हजारोच्या संख्येने हिंन्दू मुस्लिम बांधव हजर राहतात. मंगळवार (ता ७) राज्यमंत्री डॉ. पकंज भोयर यांचा सत्कार व त्यानंतर ठीक ८ वाजता दुय्यम कव्वालीचा कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. या कार्यक्रमला कव्वाल जुबैर सुल्तानी बदायु (युपी) व कव्वाल कोसर वारसी मुंबई कार्यक्रम प्रस्तुत करणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शब्बीर अली सय्यद (अध्यक्ष) भाजपा, अल्पसंख्यांक मोर्चा वर्धा जिल्हा, शेख सलीम (सल्लु भाऊ) अध्यक्ष वर्धा जिल्हा AIMIM, माजी सरपंच शालीनी आदमने, माजी उपसरपंच राहुल पाटनकर, माजी सभापती व नगरसेवक शेख नौशाद मंचावर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष इंजि. अलताफ अली यांनी केले आहे.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष शौकत अली, ट्रस्टी सय्यद युसूफ, अब्दुल सत्तार (पहेलवान), हाजी आसीफ अली, शेख आरीफ (राजा), ईरशाद शेख (ईददू भाई), इकबाल कुरेशी, सलमान पठान, ईसराईल भाई, मोहम्मद कुरेशी, शेख असलम, आरीस अली, कदीर कुरैशी, विक्रम पाहुणे, किशोर गुजर, कृणाल काकडे, अहेमद अली, निशाद भाई, सोनु भाई, प्रतीक वाघमारे, अमोल देवतारे व अमोल शेन्डे, हे परिश्रम घेत आहे.