

वर्धा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिस वेलफेयर विभागाच्या निर्माणाधीन पेट्रोलपंप हटविण्यात यावा या मागणीकरीता पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या माध्यमातुन साखळी उपोषण चालू आहे. अनेक राजकीय आणि सामाजीक संघटनांचा या साखळी उपोषणात सहभाग आहे.
साखळी उपोषणाचा आज अकरावा दिवस असून बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्हा अध्यक्ष मोहन राईकवार यांच्या नेतृत्वात आज साखळी उपोषण करण्यात आले. पेट्रोल पंप हटलाच पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासन, पालक मंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनच्या विरोधात तीव्र निषेध व मुर्दाबादचे नारे देण्यात आले. जोपर्यन्त पेट्रोल पंप हटणार नाही तो पर्यंत तीव्र आंदोलन चालूच राहील असे आंदोलन यावेळी कर्त्यांनी मत व्यक्त केले. अनोमदर्शी भैसारे, दीपक भगत, सुरेश दुधे, नितीन सुटे, विशाल रंगारी, साखळी उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांना वर्धा पोलिसांनी अटक केली.
यावेळी डॉ.गणेश जवादे, सुधाकर जुनघरे, मनीष पुसाटे जि. प. सदस्य, जगदीश कांबळे, ऍड. अभिषेक रामटेके, विपुल बौद्ध, विवेक गवळी, नितीन नरांजे, नागोराव शंभरकर, लक्ष्मण मुन, कपिल चंदनखेडे, शालीक गवळी, राज खेडकर व बसपा युवा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.