राहत्या घरी गळफास घेऊन व्यक्तीची आत्महत्या ; सेवाग्राम पोलिसांचा तपास सुरू

पवनार : येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार ता. १ सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय साठवणे (वय ४५ वर्षे, रा. पवनार) यांनी आपल्या राहत्या घरी दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवला. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अकाली मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here