वर्धा येथील होमिओपॅथी डॉक्टर दाम्पत्य विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित

वर्धा : होमिओपॅथी वैद्यकीय उपचार तसेच कोविड महामारी दरम्यान रुग्णसेवा तसेच जनजागृती करून केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल डॉ. सम्राट नंदकिशोर तोटे व डॉ. स्नेहल सम्राट तोटे यांना जागतिक होमिओपॅथी दिवसाचे औचित्य साधून विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) तर्फे शेगाव येथे हा सोहळा पार पडला. एम एस एम इ मंत्रालय भारत सरकार, पी पी डी सि (आग्रा), यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत, ए आय एम ए यांच्या तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, एम एस एम इ चे उपसंचालक श्री प्रवीण जोशी, ए आय एम ए चे अध्यक्ष डॉ. सतीश कराळे, उपाध्यक्ष डॉ. पाटील, सचिव डॉ. मनोज शर्मा, होमिओपॅथी चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, राष्ट्रीय सचिव डॉ. खुशाल नारनवरे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सम्राट व डॉ. स्नेहल तोटे यांनी होमिओपॅथी क्षेत्रामध्ये मौलिक कार्य केले आहे. कोरोना महामारी च्यावेळी त्यांनी आपल्या अथक व कर्मठ सेवेचा परिचय दिला. डॉ. तोटे दाम्पत्य अशाप्रकारे पुरस्कृत होणारे बहुदा वर्ध्यातील पहिलेच दाम्पत्य आहे. विशेष म्हणजे डॉ. सम्राट तोटे यांचे वडील डॉ. नंदकिशोर तोटे सुध्या समाजसेवेकरिता शासनातर्फे अनेकदा पुरस्कृत झाले आहेत. त्यांचाच वारसा हे दाम्पत्य पुढे चालवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here