आरोग्य यंत्रणा सज्ज : रविवारी जिल्ह्यात राबविली जाणार विशेष मोहीम १,० ९ , ३३१ चिमुकल्यांना देणार पोलिओची प्रतिबंधात्मक लस

वर्धा : जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले . त्यानंतर राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यास सुरूवात झाली . देशात १३ जानेवारी २०११ नंतर अद्याप पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात रविवार , ३१ जानेवारीला राबविण्यात येणार आहे . या मोहिमेदम्यान ० ते ५ वर्ष वयोगटातील तब्बल १,०९,३३१ चिमुकल्यांना पोलिओची लस दिली जाणार आहे . यात ग्रामीण भागातील ७९,२०० बालक तर शहरी भागातील ३०,१३१ चिमुकल्यांचा समावेश आहे . पोलिओ लसीकरण मोहिमेसाठीची संपूर्ण तयारी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे एकही बालक पोलिओच्या लसीपासून वंचित राहू नये , यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग दक्षता घेणार आहे . जिल्हाधिकारी विवेक भीमनवार , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सचिन तडस यांनी याविषयी बैठक घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत . त्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून मोहीम राबविली जाणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here