

आर्वी : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार शेतमालाची विक्री करण्याकरिता २५ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल २५ जूनपर्यंत विक्रीस आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विनोद कोटेवार यांनी केले आहे.
यापूर्वी ऑनलाइन नोंदणीची तारीख ८ ते १८ जून होती. मुदतवाढ देऊन ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही, त्यांनी २७ जूनपर्यंत नोंदणी करून घ्यावी. त्यानंतरच शेतकऱ्यांचा शेतमाल विकल खरेदी केला जाईल. नव्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आधारभूत दराने चणा या शेतमालाची विक्री करावयाची असल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विनोद कोटेवार यांच्याशी संपर्क साधावा व ठरावीक दिवशी शेतमाल विक्रीकरिता आणावा.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या होतकऱ्यांकडून एफएक्यू प्रतीच्या शेतमालाची खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल स्वच्छ व वाळवून, बारा टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता नसलेला शेतमाल विक्रीकरिता आणावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.