
हिंगणघाट : अधिक महिन्यानिमित्त वणा नदीपात्रात तिघे अंघोळीला गेले होते. या दरम्यान भाचा खोल पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच मामा त्याला वाचविण्यासाठी गेला असता मामाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शेकापूर (बाई)लगतच्या येळी-केळी घाटात बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आला.
राहुल अनिक कोळसे (3५, रा. शेकापूर बाई) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृत राहुल कोळसे, नीलेश नत्थुजी कोळसे व त्याचा भाचा असे तिघे वणा नदीपात्रातील येळी घाटात अधिक महिन्यानिमित्त अंघोळीला गेले होते. नदीपात्रात अंघोळ करीत असताना भाचा खोल खड्ड्यात बुडत असल्याचे राहुलच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने विलंब न करता त्याला वाचविण्यासाठी गेला. यामध्ये भाच्याला वाचविण्यात त्याला यश आले पण, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुहून मृत्यू ह्याला. ही बाब गातकऱ्यांना कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यावरही मृतदेह मिळाला नाही. अखेर गुरुवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. मृत राहुलच्या परचात आई-वडील, पत्नी, चार वर्षांचा मुलगा व नऊ महिन्यांची मुलगी असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
वाळू उपश्यामुळे पडलेल्या खड्ट्याने घेतला जीव
वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येळी-केळी या वाळू घाटातून अवैधरीत्या वाळू उपसा करण्यात आल्याने नदीपात्रात खोल खहटे पडले आहेत. या खड्ड्यांपुळेच राहुलचा जीव गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. परिणामी गावात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने त्याच्या परिवाराला घाटमालकांकडून योग्य पदत द्यावी. तसेच वाळूचा उपसा करणाऱ्यांची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांसह माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार, पाजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक तिजारे यांनी केली. घटनास्थळी हिंगणघाट आणि वरोरा येथील पोलिस प्रशासन, महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती.


























































