चिमुकल्या श्रीशाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ; परिसरात हळहळ व्यक्त

वर्धा : मागील ४ दिवसापासून निमोनिया आजराचा उपचार सुरु असलेल्या १५ महिन्याच्या चिमुकलीचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवार त. ३ घडली. श्रीशा सुजान अवजेकर (वय १४) महिने असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

श्रीशा हिला सर्दी, खोकला, ताप आल्याने पाच दिवसाआदी खासगी रुग्णालयात नेले होते होते. मात्र प्रकृतीत सुधारणार होत नसल्याने कुटूंबानी तिला ४ दिवसाआदी सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरु केले असता, तिला निमोनियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवस सर्वसामान्य वॉर्डात ठेवल्यावर श्रीशाच्या तब्बेतीत सुधारणार होत नसल्याने तिला रविवारी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र श्रीशाने उपचारास प्रतिसाद दिला नाही. रात्री १.३० वाजताच्या दरम्यान तिने शेवटचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केले. या घटनेने अवजेकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here