Home ◼️ संपादकीय दस्तावेज बनावट, मात्र फसवणूक खरी ! निवृत्त कर्मचाऱ्याचे ६२.७० लाख लंपास

दस्तावेज बनावट, मात्र फसवणूक खरी ! निवृत्त कर्मचाऱ्याचे ६२.७० लाख लंपास

वर्धा : रेल्वेत पेन्शन केस सुरू असल्याचे भासवून बनावट दस्तावेजाद्वारे सेवानिवृत्त शिक्षकाला तब्बल ६२ लाख ७० हजार रुपयांची चुना लावत फसवणूक केली. ही घटना कला लॉनजवळ म्हसाळा गावात घडली. या प्रकरणी सेवाग्राम पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शुद्धोधन सुखदेव धनविज (६१) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना चेतन विनायक लगड रा.दहेगात ह.मु, इंजापूर आणि अक्षय लेंडे रा.इंजापूर यांनी आईच्या पेन्शनकरिता केस टाकायची आहे असे सांगत, जुलै २०२२ ते मार्च २०२४ पर्यंत विविध पद्धतीने रोख रक्‍कम दिली. दोघांनी पैसे परत करतो, असे सांगत धनादेशाच्या स्वरूपात १७३ कोटी रुपये रक्‍कम जमा केल्याबाबतची बँकेची खोटी बनावट पावती, रेल्वेत केस सुरू असल्याचे बनावट कागदपत्रं पाठवून त्यांच्याकडून रोख, तसेच धनादेश स्वरूपात वारंवार पैसे उकळले. ते पैसे परत न केल्याने दोघांनी तब्बल ६२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समजल्याने त्यांनी सेवाग्राम ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!