
वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढून अटक केलेल्या आरोपीच्या भावाने चक्क युवकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात कारमालकाचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड परिसरात रात्री ९३० वाजताच्या सुमारास घडली. जुनाने (२१) याचा ९ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अक्षय चव्हाण, कार्तिक तांबे यांच्याशी वाद झाला होता. याप्रकरणात वाद करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीतील एकाचा भाऊ अंकुश तांबे याने १० फेब्रुवारी रोजीच्या रात्री जीतू जुनाने याच्या महागड्या कारवर पेट्रोल टाकून पेटविले. जीतूची आई माला विजय जुनाने यांनी धाव घेतली असता अंकुश तांबे याने तेथून पळ काढला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी जळत्या कारवर पाण्याचा मारा करून आग विझविली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.



















































