
वर्धा : ट्रॅक्टर क्रमांक एमएच 40 ए 4467 ला ट्राली क्र. एमएच 40 एल 4571 मध्ये अवैध रेतीची वाहतूक करताना रेतीसह 1 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कुल्हा ते उमरी रोडवर 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता समुद्रपूर पोलिसाच्या वतीने करण्यात आली.
चालकाचे नाव किरण ऊर्फ मनीष प्रेमनाथ तिमांडे (वय 35) रा. उमरी. ता. समुद्रपूर असे आहे. त्यास रेती वाहतूक परवाना रॉयल्टीबाबत व ट्रॅक्टरच्या कागदपत्राबाबत विचारले असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. उमरी शिवारातील नांद नदीतून 100 फूट रेती किंमत 3 हजार रुपये चोरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रेतोीसह एकूण 1 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी नीतेश मैदपदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण उर्फ मनीष प्रेमनाथ तिमांडे याच्याविरुद्ध समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.
















































