

वर्धा : पेट्रोल भरून असलेल्या टॅंकरने थेट रेल्वे फाटकाला धडक दिल्याची घटना बुधवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नजीकच्या चिकणी- जामणी परिसरातील निमगाव शिवारात घडली. या अपघानंतर तब्बल तीन तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती
अंबोडी चौकी येथील रेल्वे फाटक अर्धवट उघडताच एम.एच. 34 बीजी 5768 क्रमांकाचा टँकरचालक विठ्ठल मोरे याने टँकर नायरा कंपनीत काही भाग रेल्वे फाटकाच्या लोखंडी खांबाला धडकल्याने लोखंडी खांब तुटून थेट रेल्वे गाड्यांना विद्युत पुरवठा करणा-या प्रवाहित विद्युत तारेवर पडला.
त्यात रेल्वे विभागाचे जवळपास 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे 50 हून अधिक कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातामुळे दुपारी 1.30 ते 5 वाजेपर्य नागपूरकडून मुंबईकडे जाणार रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर हावडा- मुंबई मेल ह एक्स्प्रेस वर्धा स्थानकावरून एक तास उशिराने सोडण्यात आली.