

वर्धा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षात गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन करतील, अशी माहिती विश्वविद्यालयाचे कुलसचिव श्री कादर नवाज खान यांनी दिली. ते म्हणाले की विश्वविद्यालयातील गांधी हिल्सवर 2 ऑक्टोबर 2021 की रोजी सायंकाळी 07.00 वा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दीप लावून आरोग्य दीपोत्सवाचे उद्घाटन करतील.
दीपोत्सवाआधी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी विश्वविद्यालयातील कस्तूरबा सभागृहात ‘गांधीजींचे तत्वज्ञान वैश्विक सांप्रदायिकतेचा उपाय’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेतील. चर्चासत्रात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक व गोंडवाना विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी आणि फिल्म अभिनेता श्री नितीश भारद्वाज हेही भाग घेतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल राहतील. कुलसचिव म्हणाले की श्री राज्यपाल भगत सिंह कोश्यारी विदर्भ क्षेत्रातील विश्वविद्यालयांचे के कुलगुरू, संस्थांचे निदेशक आणि शिक्षणतज्ज्ञांसोबत बैठक घेतील.
उल्लेखनीय असे की गांधी जयंती निमित्त दीपोत्सवाची सुरूवात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांच्या प्रेरणेतून 2019 मध्ये झाली होती. वर्धेतील नागरिक सुद्धा आता दीपोत्सवात सहभागी होत आहेत. या वर्षीचा दीपोत्सव कोरोनाजनित संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि आरोग्याची कामना करत आयोजित केला जात आहे.