

आर्वी : शेतमजुराने शेतातीलच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी वलीपूर गावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली. अनिल जगन्नाथ शिंदे (3२) स. अंबिकापूर असे मृत शेतमजुराचे नाव आहे.
अनिल हा अभिजित काळे यांच्या शेतात कामाला होता. ट्रॅक्टर चालवून तो शेतीची कामे करायचा. त्याने शेतात असलेल्या झाडाला दोराने गळफास घेत आत्महत्या केली. अभिजित काळे यांनी याबाबतची माहिती आर्वी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नव्हते. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलं असा आप्तपरिवार आहे.