शिवीगाळ करण्यास हटकले, काठीने झोडपले

पुलगाव : शिवीगाळ करण्यास हटकले असता व्यक्तीला काठीने मारहाण करीत जखमी केले. पुलगाव येथे ही घटना घडली. अजय शंकर गाते हा कुटुंबासह घरी असताना पुंडलीक गाते रा. सोनोरा ढोक हा त्याच्या घससमोर आला आणि विनाकारण शिवीगाळ करू लागला. दरम्यान अजयने शिवीगाळ करण्यास हटकले असता पुंडलळीकने वाद करीत काठीने अजयला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here