शतपावलीस गेलेल्या व्यक्‍तीवर चाकूने वार! हिंगणघाटच्या फुले वॉर्डातील घटना; गुन्हा दाखल

वर्धा : बगिच्यात फिरायला गेलेल्या व्यक्तीवर मद्यपीने चाकूहल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १२ रोजी रात्रीच्या सुमारास हिंगणघाट शहरातील फुले वॉर्डात घडली. याप्रकरणी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नारायणसिंग शंकरसिंग बैस (५६, रा. गौतम वॉर्ड) असे जखमी व्यक्‍तीचे नाव आहे. नारायणसिंग हा चुलत भाऊ उत्तमसिंग बैस याच्यासोबत शिवाजी उद्यानात शतपावली करण्यासाठी गेले होते. तेथून पायी घरी जात असताना समोरून गणेश मेश्राम हा मद्यधुंद अवस्थेत ङुलत आला आणि त्याचा धक्का नारायणसिंगला लागला. नारायणने मला धक्का का मारला, असे म्हटले असता गणेशने शिविगाळ करून तेरे को देखता हूं, असे म्हणून तो तेथून निघून गेला. काही वेळाने गणेश मेश्राम हा चाकू घेऊन आला आणि त्याने नारायणच्या पोटावर व पायावर सपासप वार करून तेथून पळून गेला. नारायण गंभीर जखमी झाल्याने त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here