

हिंगणघाट : वर्धा येथील डाँ. आंबेडकर चौक येथे पेट्रोल पंपचे बांधकाम सुरु आहे डाँ. आंबेडकर चौक येथे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम नेहमी होत असतात. कार्यक्रमात उत्साही कार्यकर्ते कधी कधी फटाक्याची आतीशबाजी करतात. पेट्रोल पंप हे ज्वलंतशील प्रकार आहे त्यामुळे जीवितहानी निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्थानिक वंचित बहुजन आघाडी शाखा हिंगणघाटच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या परिसरात पावसामुळे कित्तेक वर्षांपासुन पाणी व चिखल जमा होते स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष केंद्रित करून योग्य ति कार्यवाही करावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल वासेकर जिल्हा सचिव विक्रांत भगत, सुहास जिवनकर,अशोक रामटेके, ललित धनविज, अजय डांगरे, सिद्धार्थ जामणकर, हर्षल कुत्तरमारे, मोहनंद गायधने, अनिकेत कुंभारे, अमोल निमसरकार, नयन ठमके प्रामुख्याने उपस्थित होते.