

वर्धा : १९ वर्षीय काकाने १० वर्षीय पुतणीचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी काकाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडितेचे आई-वडिल नागपूर येथे गेल्याने ती तिच्या काकाच्या घरी राहत होती. पीडिता आपल्या लहान बहिणीसोबत खोलीत झोपून असताना काकाने घरात प्रवेश करीत पीडितेचे तोंड दुपट्ट्याने बांधून तिला उचलुन नेत लगतच्या शेतात नेले. शेतात नेत पीडितेशी बळजबरी करीत अत्याचार केला. इतकेच नव्हे तर जर कुठेही याची वाच्यता केल्यास जीवाने ठार मारण्याची धमकी दिली.
अखेर पीडितेच्या बयाणावरुन आरोपी काकाला सिंदी रेल्वे पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपीने पीडितेला तिच्यासोबत घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास तूला जीवानिशी ठार करेल, अशी धमकी दिल्याने पीडिताही थोड़ी घाबरलेली होती. पण अखेर तिने या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.