

वर्धा : माझ्या मुलाला गावातील दोघांनी मारहाण केल्यानेच माझ्या मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली. बरबडी येथे ही घटना घडली असून याबाबतची तक्रार वडिल महादेवसिंग काकस यांनी सेवाग्राम पोलिसात दिली आहे.
विजय काकस याला गावातीलच जीवन लक्ष्मण भलमे, सचिन लोहकरे यांनी साखळीने मारहाण केली होती. त्याच कारणातून विजय मानसिक तणावात होता. त्याने तणावातून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. अशी तक्रार वडिल महादेव काकस यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली आहे.