
आर्वी : वास्तू पुजनावेळी झालेल्या वादात व्यक्तीस तिघांनी काठीने मारहाण केली. वाढोणा परिसरात ही घटना घडली. गंगाधर गुलाब धांदे हे रामदास भागवते यांच्या शेतातील विहिरीच्या वास्तू पुजनाच्या जेवणाच्या कार्यक्रमात गेले असता, विनोद ठाकरे आणि प्रश्नांत बोरकर यांच्यात शाब्दीक वाद झाला. वाद सुरू असतानाच गंगाधर यांनी त्यास हटकले असता, प्रशांत बोरकर याने गुलाबला धक्का देत खाली पाडले. दरम्यान अक्षय बोरकर, शुभम नागदिवे यांनी काठीने मारहाण केली. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



















































