
हिंगणघाट : मागिल ३ वर्षापासुन सरकार दरबारी अडकून पडलेल्या आरटीईच्या निधीमुळे शाळा संस्थाचालकावर संकट निर्माण झाले आहे. आधीच कोरोणाच्या संकटामूळे पालक वर्ग शाळा शुल्क भरण्यास असमर्थता दाखवत आहे. ज्यामुळे शाळेचा गाडा चालवणे कठीण झाले आहे. त्यात ३ वर्षापासुन आरटीईचा परतावा न मिळाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात आज ‘मेस्टा’ चे अधिकारी वर्ग, जवळजवळ २० शाळांचे संस्थाचालक तसेच शाळांच्या मुख्याध्यापकांनी संयुक्तरीत्या विद्यमान आमदार श्री. समिर कुणावार यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या. तसेच काही नवीन मागण्याही करण्यात आल्या.
यावेळेस आमदार साहेबांनी मा. शिक्षणाधिकारी वर्धा, शिक्षण संचालक पुणे यांचेशी आरटीई प्रतिपुर्ती बाबत फोन वरून चर्चा केली. यावर आयुक्तांनी सांगितले की फक्त ५० कोटीची तरतूद महाराष्ट्राकरिता करण्यात आलेली आहे. आणखी १ महिना आरटीई प्रतिपुर्तीसाठी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यांनी सर्व समस्या जाणून घेतल्या आणि शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू असे आश्वासन दिले.
यावेळी मिलींद दिक्षित, आकाश जैसवाल, जयंत भोयर, दिक्षीत मँडम, सांगेवार मँडम, ठाकरे मँडम, यादव सर, अजय फुलझेले, वैशाली पोळ, वासुदेव चौधरी, मडावी मँडम, डेकाटे मँडम, संदीप सरोदे, सचिन डावरे प्रामुख्याने उपस्थित होते.
















































