

समुद्रपुर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विज बिल दरवाढीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यामुळे कोरोना संक्रमनाचे काळात प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे विरोधात हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आंदोलनाला प्रशासनाने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती मात्र मोठया संख्येने नागरिक व मनसेचे कार्यकर्ते जमा झाले होते. यातच सामाजिक अंतराचे पाल केले नसल्याचा ठपका ठेवत हिंगणघाट तालुक्याचे मंडळ अधिकारी श्री निनावे यांच्या तक्रारीवरुन हिंगणघाट पोलिसांनी अतुल वांदिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.