

देवळी : येथील पोलिस स्टेशन अंतर्गत कोरोना महामारी विरुद्ध शासन, पोलिस दल यांना बरोबर घेवून सामाजिक कार्य करुन कोवीड १९ या रोगाविषयी जनजागृती करणार्या सामाजीक कार्यकर्ते व पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
समाज प्रबोधन व समाज जागृती या कार्यात बरोबर राहुन पोलीस पाटील यांनी व त्यांना मदत करणार्या समाजसेवकांनी कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत ठाणेदार नितीन लेव्हकर यांनी पोलीस पाटील व समाज सेवक यांचा प्रमाणपत्र देवून गौरव केला.
या कार्यक्रमात शोसल डिस्टन्स ठेवून पोलिस पाटील, त्यांचे पाल्य जे दहावी बारावी उत्तीर्ण झाले, त्याचे मनोधैर्य वाढावे व पुढे शिक्षणात उंच भरारी घेवून समाजाप्रती काहीतरी सेवा करण्याची जवाबदारी म्हणून शासकीय सेवेत येवून पोलीस पाटील यांची मान उंचावण्याची संधी प्राप्त करावी या करीता पोलीस पाटील यांच्या पाल्यांना दहावी बारावीत जे गुणानुक्रमे उतीर्ण झालेत त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविल्या गेले.
यावेळी ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी पोलीस पाटील यांना संबोधन करतांना सांगितले की आपल्या कुठल्याही तक्रारीची दखल घेतल्या जावून आपणास योग्य तो सन्मान दिल्या जाईल. पोलिस पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे प्रत्येक पोलीस पाटील यांनी स्वतःची आचारसंहिता तयार करावी व ती मोडू नये समाजातील लोकांना पोलीस पाटलांकडून न्यायाची अपेक्षा असते कोरोणा महामारीत त्यांनी जे उत्कृष्ट कार्य केले ते खरोखरच अंभिनंदनीय असून पुढे ही आपण सकारात्मक रहाल याबद्दल शंका नसल्याचे लेव्हरकर यांनी सांगितले.
कार्य क्रमाचे संचालन श्री बुटे यांनी केले. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रमेश ढोकणे, पोलिस पाटील हेमंत ढोले, अरविंद कांबळे, किरण होरे, जनार्दन भगत, विश्वेश्वर लाबंट, कल्पना महल्ले, उषा डहाके, पपीता मुन, स्मिता थुल, दिपीका वाघमारे सामाजिक कार्यकर्ते रमेश धुमाळ यांच्यासह पोलिस पाटील व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.