जय श्रीराम’च्या जयघोषात निघाली भव्य रॅली; ढोल-ताशांचा गजर ! पवनारमध्ये हनुमान जयंती उत्साहात

पवनार : हनुमान जयंतीच्या निमित्ताने पवनार येथे बजरंग दलाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन उत्साहात पार पडले. गुरुवार (ता. २) रोजी सकाळपासूनच गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. सेवाग्राम रोडवरील हनुमान मंदिर परिसरातून रॅलीची सुरुवात करण्यात आली. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. रॅलीत ढोल-ताशांचा गजर, बँड पथकांचे सूर आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

ही रॅली बस स्थानक चौक, ग्रामपंचायत चौक, बाजार चौक, तसेच आबाजी महाराज देवस्थान मार्गे संपूर्ण गावातून मार्गक्रमण करत पार पडली. रॅलीमध्ये विविध देखावे सादर करण्यात आले होते. लाठी-काठीचे प्रात्यक्षिक, नृत्य पथकांचे सादरीकरण आणि राम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषेत बालकलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीदरम्यान गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पवनार येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

यावेळी विजय लाकडे,पंकज नेहारे, गजानन लोकरे, भारत बावणे, मारुती उमाटे, अनिल मुंगले, बंटी लोकरे, निलेश वाघमारे, साहिल पाहुणे, विकी रघाटाटे, पंकज मरसकोल्हे, अमोल गवळी, भूषण मुंगळे, वैभव उमाटे, निलेश धाकड, शारदाताई राऊत, वैशाली टिपले, शुभांगी देशमुख, पल्लवी राऊत, नयना बोरकर, प्रीती राऊत, संगीता मुंगले, राणी धाकतोड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here