

अल्लीपूर : पेट्रोल पंपावरून डिझेल भरून ट्रेलर मुख्य रस्त्यावर येत असताना समोरून सरळ जाणाऱ्या बसला जाऊन धडकला. यात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून बसचालक गंभीर तर बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात धोत्रा चौरस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर शनिवारी १२ वाजतादरम्यान झाला.
धोत्रा गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावरून एम. पी. ०४ एच. इ. 33९९ क्रमांकाचा ट्रेलल डिझेल भरून महामार्गावर येत होता. याच दरम्यान एम. एच.४० सी.एम.3१९० क्रमांकाची राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस वर्धेवरून हिंगणघाटकडे जात होती. तेव्हा हा ट्रेलर चालकाने इतके-तिकडे न बघता निष्काळजीपणे ट्रेलर मुख्य मार्गावर आणत बसला समोरून धडकला. धडक इतकी भीषण होती की, बसच्या समोरील भागाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. यात बसचालक अजहर खान अखतर खान (४०) यांच्या पाया गंभीर दुखापत झाली. यासोबतच बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर एकच धावपळ उडाली आणि घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.
अपघातानंतर ट्रेलर चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय घुले सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सोबतच जाम महामार्ग पोलिस मदत केंद्रातील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे, भय्याजी तोडासे, भारत पिसुडे, अशोक भोगे, विजेयंद्र कैलासकर, अभ्रय इंगळे, प्रेमिला घवघवे, दीपा तांबेकर यांनीही पोहोचून जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचाराकरिता सेवाग्राम रूणालयात हलविले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक अर्धातास खोळंबली होती. पोलिसांनी अल्पावधीच वाहतूक सुरळीत केली.
जखमी प्रवाशांमध्ये यांचा आहे समावेश
या अपघातात बसमधील पुरुषोत्तम येरमे (४९) रा. बोरगाव (मेघे), प्रवीण बडनेरकर (३०) रा. सावली जि. वाशिम, संजय कुलमेथे (४५) रा. माणिकवाडा जि.यवतमाळ, उमेश लहाने (३९) रा. वर्धा, करणसिंग लालाजी चव्हाण (५०) रा. हिंगणघाट, कृष्णाजी वांदिले (६४) रा. वायगाव (निपाणी), लद्दमी जाथव (४०) रा. पुलगाव, लता राजेंद्र घाटुले (५०) रा. हिंगणघाट, नासीर खान (५५) रा. अमरावती, राधिका नासीर खान (४५) रा. आपरावती, तुमान नासीर खान (१५) र) आररावती व सुरेंद्र वासनिक (३३) रा. बोरगाव (मेघे) असे जखमींची नावे आहेत.