विदर्भ पटवारी संघाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी संजय भोयर यांची निवड

वर्धा : विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा वर्धाची वार्षिक आमसभा रवीवार (ता. १६) यमुना लॉन वर्धा येथे पार पडली. सभेमध्ये पुढील वर्षासाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली. संजय भोयर यांची अध्यक्षपदी, अमोल रामटेके यांची सचिवपदी, सारंग भाईक यांची उपाध्यक्षपदी, तर आशिष सहारे सहसचिव पदी फेर निवड करण्यात आली.

सभेमध्ये पटवारी संवर्गाच्या शासन स्तरावर प्रलंबित मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सदर सभेला वर्धा उपविभागातील बहुसंख्य तलाठी उपस्थिती होती. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजय गंद्रे, जिल्हा सचिव प्रदीप इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश झोरे, जिल्हा संघटनेचे माजी अध्यक्ष शैलेंद्रजी देशमुख, आर्वी उपविभागाचे माजी सचिव योगेश लताड, जिल्ह्यातील पटवारी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे यशवंत लडके, सतीश बरवट, श्यामजी भट, तीलक चंदनखेडे, कैलासजी पळसकर, बालाप्रसाद ढोणे, संजय आगलावे, कपिल बुलकुंडे, पंडित नरवडे, अंकुश दुर्वे, किरण गाथेकर, लतिका लोखंडे, महेश दुबे, निलेश ठमके, समाधान भोसले, किशोर चोंदे पाटील , सुहास डगवार, यांनी अभिनंद केले नवनियुक्त अध्यक्ष संजय भोयर यांनी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले सभेचे संचालन श्री सारंग भाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव अमोल रामटेके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here