

वर्धा : वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करीत तिघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी वाळूसह २२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सालोड हि. गावात १९ रोजी रात्रीच्या सुमारास केली, पोलिसांनी अटक केलेल्यांत शंकर विठुल तळवेकर (३०), जनार्धन ज्ञानेश्वर पेटकर (४३), अफरोज अब्दुल शेख (३०, सर्व रा. सालोड) यांचा समावेश आहे.
वाळूचा उपसा करून अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सालोड गावात नाकाबंदी केली असता एमएच २९ आर ८२९२ क्रमांकाचा ट्रॅक्टर एमएच ३२ ए ८६२० क्रमांकाची ट्रॉली, एमएच ३२ एएच ८७८५ क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि एमएच 5२ एएच ८७८९ क्रमांकाची ट्रॉली आणि विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीतून वाळू वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह २२ लाख ८० हजार रुपयांचा वाळूसाठा जप्त करून सावंगी ठाण्यातील पोलिसांना स्वाधीन करून गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक संदीप गाडे, रोशन निंबोळकर, सागर भोसले, अभिजित गावंडे यांनी केली.